Jalgaon News: आठवडाभरात सादर होणार मिनीमंत्रालयाचा अर्थसंकल्प

जळगाव : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता काही दिवसात र लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत 1 आहे. त्यामुळे मिनीमंत्रालयात विकास 1 कामांचा निधी खर्च करण्याची लगबग यासह अर्थसंकल्पासाठीची धावपळ सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात जि.प.चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प ४३ ते ४४ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या अर्थसंकल्पात सीईओंकडून अंगणवाड्याच्या विकासावर व कुपोषण मुक्तीवर फोकस ठेवला असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची फी देखील जि.प च्या सेसफंडातून देवून विद्यार्थ्यांना परिक्षेत प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार असल्याचे सीईओ श्रीअंकित यांनी सांगितले.मिनीमंत्रालयाचा अर्थसंकल्प जि.प.च्या ठराव समि तीच्या बैठकीत मंजूर करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात मिनीमंत्रालयाला जिल्हा परिषदेतून जिल्ह्यातील मुंद्राक शुल्क व जमिनी महसुल, अभिकरण शुल्क यासह विविध करातून घसघशीत उत्पन्न मिळाले आहे. त्यातच विविध योजनांसाठी आलेल्या निधीवर व्याज देखील मिळाले असल्याने यंदाचा अर्थसंकल्प ४४ कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परिक्षेसाठी तरतुद ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षांसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेकडून या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षा फी स्वतः सेस फंडातून भरली जावी यासाठी तरतुद करण्याची तयारी केली आहे. यासाठी यंदा जि.पच्या अर्थसंकल्पात तरतुद केली जाणार आहे.अंगणवाड्यांसाठीही तरतूद जिल्हाभरात कुपोषणचे प्रमाण कमी व्हावे, तसेच अंगणवाडीस्तरावरूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा यासाठी खास योजना आणली
सलग दुसऱ्यांदा प्रशासकच करणार अर्थसंकल्प सादर

जि.प.त गेल्या दोन वर्षापासून निवडणूका झाल्या नसल्याने प्रशासकांच्या हाती जि.प.ची सुत्रे आहेत. गेल्या वर्षी देखील प्रशासकांकडूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा देखील जि.प.चे सीईओ हेच अर्थसंकल्प मंजुर करतील. प्रत्येक विभागाकडून मागणी म ागविण्यात आली असुन २५ फेब्रुवारीपर्यंत हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.
जाणार आहे. यात अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना तीन वर्षात अन्नाची, अक्षराची ओळख व्हावी यासाठी अंगणवाड्यांच्या सेविकांना प्री. प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच काही साधन सामग्रीसाठी तरतुद केली. जाणार आहे. तसेच कुपोषण दुर करण्यासाठी आशा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर, अंगणवाडी पर्यवेक्षीकांच्या मदत घेवून सेस फंडात काही तरतुद केली जाणार आहे