जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या शासकीय वाळू डेपोचे शुक्रवार, २३ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तापी नदी पात्रातील नांदेड येथे डेपोचे उद्घाटन करण्यात आले. राज्य सरकारच्या धोरणानुसार आता वाळू ६०० रुपये प्रति ब्रास मिळणार आहे. शासकीय डेपो कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुलासाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव यांनी दिले.
पाटील यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा खानिकर्म अधिकारी रवींद्र उगले, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार सातपुते, गटनेते पप्पू भावे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. वाळूअभावी घरकुलाची कामे राज्यात मोठ्या प्रमाणात रखडली होती.
वाळूच्या अवैध विक्रीमुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. घरकुलासाठी मंजूर झालेल्या रकमेत घरकुल लाभाथ्याना घर बांधणे अवघड झाले रणामुळे सर्वांना वाळू सहज आणि वाजवी दरात उपलब्ध होणार असून शासनाला महसूल मिळणार असत्याचे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. शासनाच्या धोरणानुसार दलित, आदिवासी यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार घरकुल दिले जाते.
आता या घरासाठी शासनाने घेतलेल्या ‘घरकुल धारकांना मोफत वाळू’ या सर्वसामान्यांचे हितासाठी हा क्रांतिकारी निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगून रमाई घरकूल, शबरी घरकुल व अन्य बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रम ाणात घरकूल योजनांद्वारे घरांची वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही यासंदर्भात गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन आता त्या – त्या तालुक्याच्या तहसीलदार यांनी करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वाळू डेपोच्यासंदर्भातील प्रशासनाची भूमि मांडली.
का सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले. याप्रसंगी तालुक्यातील अनिता सैदाणे, अनिता बावस्कर यांचा साडीचोळी व बुके देवून तसेच दिलीप केदार यांचा रुम ाल व टोपी देवून पालकमत्री गुलाबराव पाटील, कमिशनर राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार केला. या घराकुल धारकांना प्रत्येकी ५ ब्रॉस रेतीचे वाटप करण्यात आले.