जळगाव : महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनासह मिटींग हॉलमधील विविध सुविधांवर सुमारे पाच लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदाही प्रकाशित करण्यात आली आहे.महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आयुक्तांचे दालन आहे. तीन महिन्यांपूर्वी या दालनाचे व मिटींग हॉलचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
.ाच दालनात व मिटींग हॉलमध्ये सिलींग फॅन लावणे, इलईडी ट्यूब लावणे, मॉड्युलर स्वीच, जंक्शन बॉक्स, ऑडीओं/व्हिडीओ कॉड, केसींग केपींग पट्टी इत्यादी विद्युत संबंधीची कामे करण्यासाठी २ लाख ३७ हजार ९४८ रूपयांचा खर्च होणार आहे. तर आयुक्त यांच्या दालनात व मिटींग हॉल नूतनीकरण करणात वायर पुरविणे,बसविणे, विद्युत संबंधीची कामे करणे यासाठी २ लाख ५२ हजार ५८० रूपये खर्च करण्यात येणार आहे.ही दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. हा खर्च मनपाच्या निधीतून देण्यात येणार आहे.
निविदा भरण्याची अंतिम मुदत १५ मार्चपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्याच दिवशी शक्य झाल्यास निविदा उघडण्यात येणार आहे. निधी उपलब्धतेनुसार मिळणार निधी दालनातील कामांसाठी दुसऱ्यांदा फेरनिविदा काढण्यात आली असून निधी उपलब्धतेनुसार बिलाची अदायगी करण्यात येणार आहे. सध्या आयुक्तांच्या दालनाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विद्युतसंबंधातील कामे केल्यानंतर दालनासह मिटींग हॉलला कॉपरेट लुक येणार आहे.