Jalgaon News: उसनवारीच्या पैश्यांच्या वादातून शस्त्राने वार ; परस्परविरोधात गुन्हा

जळगाव :  हात उसनवारीचे पैसे देणे-घेण्यावरुन धारदार शस्त्राने हत्यार उपसत एकमेकांवर चालवून दुखापती झाल्या. असोदा बस स्टॅन्डजवळ बुधवार १७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घटना घडली. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरुन सहा जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुरुवार १८ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. अजय तुकाराम पाटील (२३) रा. असोदा हा तरुण अंडाभुर्जीची लॉरी लावून उदरनिर्वाह करतो. लॉरीजवळ साथीदारांसह योगेश कोल्हे लॉरीजवळ आले.

त्यावेळी अजय पाटील याने योगेश कोल्हे याला हातउसनवारीने दिलेले ५० हजार रुपयांची मागणी केली. योगेश याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी अजय पाटील याला विगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. कल्पेश इंगळे याने लहान चाकु मारत अजय याच्या पायाला दुखापत केली. तक्रारीवरुन योगेश दिंगबर कोल्हे, मयुर कोळी, दीपक धनराज सपकाळे, कल्पेश निलेश इंगळे, मोहित सपकाळे सर्व रा. असोदा यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. तपास पोहेका सुधाकर शिंदे करत आहेत. मयुर विजय सपकाळे (२१) रा. असोदा हा तरुण मजुरी करुन उदारनिर्वाह करतो.

मयुर याने बुधवारी रात्री अजय तुकाराम – पाटील रा. असोदा याच्याकडे हात उसनवारीने दिलेल्या पैश्यांची मागणी केली. याचा राग आल्याने अजय पाटील याने शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करत जखमी केले. याप्रकरणी तक्रारीवरुन अजय पाटील याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपास पोउपनि माणिक सपकाळे करीत आहेत.