Jalgaon News: काँक्रिटीकरण, डांबरी रस्त्याच्या ३० निविदा पुन्हा मागविल्या

जळगाव : डिपीसी निधीतील काँक्रिट व डांबरी रस्त्यांच्या ३० निविदा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्या अटी व शर्तीसह पुन्हा नव्याने मागवण्यात आल्या आहेत. डिपीसी निधीतील ९५ कामांपैकी ५५ कामांचे कायदिश देत ते बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार शहराच्या विविध भागात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

३० कामांच्या निविदा नव्याने ३० कामांच्या निविदेतील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल करून पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानुसार मक्तेदारास दीड दीड कोटी पर्यतची यंत्रसामग्री भाड्याने घेता येणार फेब्रुवारीपर्यत गाळ्यांचे भाडे ठरणार महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्याबाबत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती पीडब्ल्यूडीला दिले पत्र

शहरातील विविध रस्त्यांची कामे पीडब्ल्यूडीकडून करण्यात येत आहे. या कामांना नाहरकत देताना भुयारी गटारींच्या चेंबरसाठी व इतर कामांसाठी जागा सोडण्याचे सांगण्यात आले होते. मात्र ना हरकतमधील नियम, अटी व शर्तीकडे दुर्लक्ष करून काँक्रिटीकरण केले जात आहे. याबाबत मनपाने बांधकाम विभागाला पत्र देत लक्ष वेधले आहे.

नियुक्त केली आहे. या समितीच्या बैठका होत आहेत. त्या त्या व्यापारी संकुल परिसरातील खासगी व्यापारी संकुलाच्या भाड्यांची माहिती घेत अंतिम भाडे ठरविण्यात येणार आहे. यानुसार फेब्रुवारीपर्यत गाळ्यांचे भाडे निश्चित करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले.मुख्य रस्त्यावर फुटपाथ टॉवर चौक ते काव्य रत्नावली चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँकिटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या बाजूला फुटपाथ तयार करण्यात येणार आहेत. यामुळे पायी जाणाऱ्यांसाठी सुविधा होईल