Jalgaon News: गल्लीत गाडी लावण्यावरुन हाणामारी, पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : गल्लीतील रोडवर गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद होऊन एकमेकांमध्ये शिविगाळ हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल झाले.38 वर्षीय महिला लाकूडपेठ शिवाजीनगरात वास्तव्यास आहे. गल्लीतील रस्त्यावर गाडी लावण्याच्या कारणावरुन महिलेच्या दिराशी राजेश पाटील यांनी झटापटी करत शिवीगाळ केली. हे भांडण सोडविण्यासाठी तक्रारदार महिला तसेच तिची देराणी गेल्या असता सचिन पाटील याने शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेच्या पतीला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलांना अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी तक्रारीवरुन राजेश पाटील, सचिन पाटील, विनायक पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

गाडी लावण्याच्या कारणावरुन मारहाण करुन शिवीगाळ केल्याची तक्रार लाकूडपेठेतील 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली. प्रशांत भावसार याने महिलेचे आई वडिल तसेच चुलतभाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच राहुल भावसार, रमेश भावसार यांच्यासह तिघा महिलांनी गर्दी जमवून महिलेच्या आई वडील तसेच चुलतबंधू यांना शिवीगाळ करत चापटाबुक्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेले महिलेचे काका सचिन पाटील यांना चापटाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.
याप्रकरणी तपास मपोना अश्विनी इंगळे करत आहेत.