Jalgaon News : ग्राहकाचे दागिने लंपास करणारा रिसेप्शनिस्ट गजाआड, गुन्हा दाखल

जळगाव : रिसेप्शन काऊंटरवर ग्राहकाने ठेवलेल्या सॅकमधील तब्बल १ लाख ७० हजाराचे सोन्याचे दागिन्यांची चोरी करुन ते लपवून ठेवणारा रिसेप्शनीस्टला पोलिसांनी ताब्यात घेत अवघ्या दोन तासात या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. हॉटेल स्टार पॅलेस लॉजींग व बोर्डीग येथे हा प्रकार घडला होता.

राहुल मधुकर जाधव हे दुबई येथे वास्तव्यास आहेत. मित्रांना भेटण्यासाठी ते जळगाव येथे आले. सोमवार, २० रोजी ते येथील हॉटेल स्टार पॅलेस लॉजींग व बोर्डीग येथील रुम नं.२०७ मध्ये थांबले होते. त्यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाली. त्यामुळे त्यांनी त्यांची सॅक  रिसेप्शन काऊंटरवर ठेवली. त्यानंतर ते जवळच असलेल्या साई सिंधु हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. मंगळवार, २१ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

ते त्यानंतर हॉटेल स्टार पॅलेसच्या रिसेप्शन ले काऊंटरवर ठेवलेली सॅक घेण्यास गेले. बॅग त्यांची उघडली असता त्यात ठेवलेली त्यांची सोन्याची न चैन व दोन पेंडल दिसून आले नाही. राहुल जाधव यांनी याबाबत काऊंटरवर विचारणा केली असता. याबाबत आम्हाला काही एक माहित नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. राहुल जाधव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. याप्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकाने गुन्ह्याच्या तपासाला गती दिली. पथकाने घटनास्थळापासून तपासाचे चक्र फिरविले. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेत त्याची तपासणी केली. रिसेप्शनीस्ट स्टाफ, रुम क्लिनर स्टाफ, रुम अटेंडन्स स्टॉप या सर्व कर्मचाऱ्यांची वन बाय वन कसून चौकशी केली. रिसेप्शनीस्ट केतन धोंडू पाटील याच्या हालचाली संशयास्पद वाटली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात शोध पथकातील पोलीस हेड कॉन्सटेबल सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोलीस कॉन्सटेबल अमितकुमार मराठे, पोलीस कॉन्सटेबल मिलींद सोनवणे, पोलीस कॉन्सटेबल तुषार पाटील, पोलीस कॉन्सटेबल जयेश मोरे यांनी ही कामगिरी केली. तपास पोलीस नाईक राजेश पद्दमर हे करीत आहेत.