---Advertisement---

Jalgaon news: घरात गोमांस व आतडे ठेवणाऱ्या तरुणाला अटक, गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

जळगाव : जळगाव मधील म्हसावद तालुक्यातील इंदिरानगर मध्ये  बेकायदेशीर रित्या गोमांस घरात आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला  आहे.  २१ जानेवारी रोजी रात्री १ वाजता  एका तरुणा विरोधात  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील इंदिरानगर शाहरुख मेहबूब कुरेशी (वय-२५) हा तरुण घरात गोमांस व आतडे बेकायदेशीर रित्या घरात ठेवल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी २१ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी कारवाई करत १४० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकारणी दीपक अरुण सोनवणे यांनी दिलेल्या   फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख मेहबूब कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment