भुसावळ : भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील श्रीहरी नगरातून चोरट्यांनी तब्बल दहा लाखांची रोकड भरदिवसा लांबविण्यात आत्याने शहरातील नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घर घेण्यासाठी कुटूंबाने कर्ज काढून ही रक्कम घरात आणली होती मात्र माहितगार चोरट्याने कुटूंबातील सदस्य भरदिवसा बाहेर पडताच घराचे कुलूप तोडून रक्कम लांबवली.
सदस्य बाहेर पडताच भरदिवसा लांबवली रक्कम मुकेशकुमार राधाकिसन कुमावत (४५) कुटूंबासह श्रीहरी नगरात वास्तव्यास आहेत शिवाय ते मिस्तरी काम करून कुटूंबाला हातभार लावतात. कुमावत यांना घर घ्यावयाचे असल्याने त्यांनी अडीच महिन्यांपूर्वीच बँकेत लोन प्रकरण केले होते व कर्ज रक्कम मंजूर झाल्यानंतर त्यांनी रक्कम घरात आणून ठेवली होती. ही रक्कम त्यांनी सोफा कम बेडच्या कुशनमध्ये लपवली होती. रविवार, ७ रोजी दुपारी २.३० ते ३.३६ दरम्यान लाखोंचे दागिने सुरक्षित ; केवळ रोकड लांबवली कुमावत कुटूंबाच्या घरातून चोरट्याने केवळ बेडमध्ये लपवलेली सुमारे दहा लाखांची रोकड लांबवली मात्र चोरट्यांनी दागिण्यांना हात लावला नाही त्यामुळे परीचीत असलेल्या चोरट्याने कुटूंबावर पाळत ठेवून चोरी केल्याचा दाट संशय आहे.
लवकरच चोरट्यांना अटक करू, असा विश्वास पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी वर्तवला. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत. सुरूवातीला मुकेशकुमार, नंतर त्यांची पत्नी व नंतर मुलगा बाहेर पडल्याने घर बंद असत्याची संधी माहितगार चोरट्यांनी साधली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोफा कुशनमध्ये ठेवलली नऊ लाख ९० हजारांची रोकड काही क्षणात लांबवली. काही वेळात कुमावत कुटूंब घरी आल्याने घरफोडीचा प्रकार समोर आला. अधिकाऱ्यांची धाव, श्वान पथकाला पाचारणदुपारी चार वाजेच्या सुमारास कुमावत कुटूंब घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसताच त्यांना मोठा धक्का बसला. घरफोडी झाल्याचा प्रकार तातडीने पोलिसांना कळवण्यात आला. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, प्रभारी निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतल पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.