जळगाव : बँकेच्या कर्जाच्या हप्ताची रक्कम लोकांकडून जमा करुन दुचाकीने घेवून जात असताना दोघांनी पाठलाग करत दुचाकी अडविली. चाकूचा धाक दाखवित मिरची पावडर डोळ्यात फेकून ६० हजार रुपयांची रोकड घेत दुचाकीने पसार झाले. या दोघा संशयितांच्या अवघ्या एका तासात जामनेर पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान करीत मुसक्या आवळल्या. जामनेर येथे आयएफडीसी बँक आहे.
येथे रिलेशन मॅनेजर म्हणून सागर हिरसिंग चव्हाण (रा. गोंदेगाव ता. जामनेर) कार्यरत आहेत. शुक्रवार, १० मे रोजी दुपारी १२.४५ वाजता त्यांनी हिंगणे बुद्रुक ता.जामनेर येथे बॅकेच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम लोकांकडून गोळा केली. ६० हजाराची रोकड बॅगमध्ये ठेवून ते दुचाकीने हिंगनेकडून नेरीकडे ते येत होते. दरम्यान दोन इसमांनी एचएफ डिलक्स दुचाकीने सागर चव्हाण यांचा पाठलाग करत त्यांची दुचाकी आडविली.
त्यांना चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्यांच्याकडील ६० हजाराची रोकड घेत दोघे संशयित दुचाकीने पसार झाले. सागर चव्हाण यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. होता ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर- पवार, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनात जामनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्सटेबल अतुल पवार, पोलीस हेड कॉन्सटेबल गणेश भावसार, पोलीस कॉन्सटेबल सागर पाटील, पोलीस कॉन्सटेबल जितेंद्र ठाकरे यांनी केली.