जळगाव: जळगाव शहरामध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच पोलीस प्रशासनावरती देखील प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. चोरी करण्याचा आखलेला बेत – तळीस नेण्यासाठी चोरटे वेगवेगळी – शक्कल लढवितात. एमआयडीसीत एका कंपनीच्या भिंतीला चोरट्यांनी होल पाडून आत एन्ट्री केली. विविध इलेक्ट्रीक साहित्य गोळा करुन तब्बल ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल – लांबविला. सोमवार ८ रोजी घटना उघडकीस आली. धिरज अशोक गुंडीयाल (३६) हे सिंधी कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. व्यावसायिक असून त्यांच्या – मालकीची एमआयडीसी परिसरात डी – सेक्टरमधील गट नं. ७४ मध्ये वैष्णवी इंटरप्रायजेस इलेक्ट्रीक कंपनी आहे.
मागील बाजूच्या भिंतीला होल पाडून – चोरट्यांनी या कंपनीत प्रवेश केला. कंपनीत असलेले साहित्य त्यांनी गोळा केले. या साहित्यासह चोरटे होलमधून कंपनीच्या बाहेर पडत पसार झाले. सोमवारी सकाळी ११ वाजता ही घटना समोर आली. हा मुद्देमाल नेला चोरुन ६० हजार किंमतीचे ७० किलो वजनाचे कॉपर वायरचे तुकडे, १५ हजार ६०० किंमतीचे १२ नग पॉलीकॅब कंपनीचे सिलींग फॅन प्रत्येकी किंमत १३०० रुपये, ४ हजार किंमतीचा सीपी प्लस कंपनीचा डिव्हीआर, ५ हजार किंमतीचे सीपी प्लस कंपनीचे दोन नग सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी पोउपनि दत्तात्रय पोटे तसेच पोलिसांनी जावून पाहणी केली. तसेच माहिती घेतली. तपास सफौ विजय पाटील करीत आहेत.