जळगाव : राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जिल्ह्यातील १ ते १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम १३ फ -ब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी रोजी राहिलेले लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी मॉप अप दिन म्हणून राबविणार आहे.
दरवर्षीप्रमाणे, सन २०२४-२५ मध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत एकूण १२ लाख ९४ हजार लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण शाळा व अंगणवाडी पातळीवरून देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे. जंतनाशक मोहिमेंतर्गत जंतनाशकाची एक गोळी खाऊ घालण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्य राखण्यास मदत होते. डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जिल्हाधिकारी, सोपान कासार यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम वर्षातून दोनवेळा राबविण्यात येते.
या मोहिमेमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशक मोहिमेंतर्गत जंतनाशकाची एक गोळी खाऊ घालण्यात जिल्हा परिषदेतून विभाग व एकात्मिक बालविकास विभाग, पाणीपुरवठा या मुख्य विभागांनी एकत्र येऊन जंतनाशक मोहीम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पालकांनी आपल्या मुलांचे जंताच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करावे व राष्ट्रीय जंतनाशक १३ फेब्रुवारी रोजी मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यासाठी व मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, निवासी येते.आतड्यांमधील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणान्या रक्तक्षय कुपोषणास मोठ्याप्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यावर याचा विपरित परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी हे बऱ्याचदा आजारी असतात, त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासांकडे लक्ष केंद्रीत करू शकत नाही. यामुळे ते बऱ्याचदा शाळेत अनुपस्थित असतात.