Jalgaon News : जिल्ह्यात एसटीच्या सहा आगारात ‘ई चार्जीग’ स्टेशन

जळगाव :  प्रदुषणावर मात करण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळ सरसावले आहे. मुंबई पुण्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातही एसटी च्या ई बसेस धावणार आहे. ई बसेस चार्ज करण्यासाठीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन नाशिक प्रदेश विभागाने निविदा काढली आहे. यात जिल्ह्यातील सहा आगारांचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव विभागात सध्या ७८९ बसेस आहेत. त्याव्दारे जिल्ह्यासह राज्यात बससेवा पुरविली जात आहे. योसाबतच कोकणातील गणेशोत्सव, नांदुरी यात्रेसह मागणीनुसार जळगाव विभागातून बसेस पाठविल्या जातात.

सहा तालुक्यात होणार चार्जीग स्टेशन
मुंबई पुण्याकडे सध्या शिवाई ई बस सेवा सुरू झालेल्या आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. आता टप्प्याटप्याने या ई बस सेवा राज्यातील सर्वच आगारांना देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य परिवहन विभागाच्या अभियंत्यांनी आगारात चार्जंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा काढली आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा, व एरंडोल

 याठिकाणी चार्जीग स्टेशन होणार आहे.

अनेक बसेस कालबाह्य ७८९ बसेस पैकी काही कालबाह्य झालेल्या आहेत. नविन बसेसची मागणी केलेली असून त्यातील काही बसेस दाखल झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील सर्व आगारांना लांबपल्ल्यांसाठी देण्यात आल्या आहेत. जुन्या बसेसला दुरूस्त करून त्या चालविण्यात येत आहे.

चार महिन्यात होणार काम
निविदा प्रकिया पूर्ण झाल्यानंतर सबंधित एजन्सीला चार महिन्यात काम पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी अंदाजे प्रति आगार १७ ते १८ लाखाचा खर्च लागणार आहे. १०३ ई बसेस जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०३ ई बसेस येणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले.