भुसावळ: पोलीस ठाण्यात सीमीप्रकरणी २००१ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तब्बल २२ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला दिल्ली स्पेशल सेलच्या शस्त्रधारी पोलिसांनी गुरुवारी दुपारी भुसावळातील दत्तनगर, खडका रोड भागातून अटक केल्याने भुसावळसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ शेख उनकी आहे..संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ हे भुसावळातील खडका रोडवरील उर्दू हायस्कूलच्या १७ क्रमांकाच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गोपनीयता पाळत ही कारवाई करण्यात आल्यानंतर बंदोबस्तात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयिताला दिल्लीकडे दोन वाहनांद्वारे नेण्यात आले.
अत्यंत गोपनीयरीत्या कारवाई दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी
पोलीस ठाण्यात संशयित हनीफ शेख मोहम्मद हनीफ विरोधात २००१ मध्ये त्यावेळच्या सीमी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संशयिताने २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे मासिक ‘इस्लामिक मुव्हमेंट’मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या आरोपान्वये हा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या गुन्ह्यात संशयित सातत्याने गैरहजर राहिला असल्याने दिल्ली न्यायालयाने संशयिताला २००२ मध्ये फरार घोषित केल्यानंतर त्यास अटक करण्यासाठी दिल्ली दक्षिण विभाग साकेत विहारच्या स्पेशल सेलचे १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी दुपारी भुसावळात धडकले. संशयिताला दुपारी राहत्या घरातून अटक करण्यात आली. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल तौसीफ शेख यांची याकामी मदत घेण्यात आली. दिल्ली स्पेशल सेलचे निरीक्षक पवन कुमार, एसआय सुमित, एसआय नवदीप, एएसआय आस्वाद आदी १६ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
त्यास फरार घोषित केले होते. दिल्ली स्पेशल सेलला संशयिताबाबत अत्यंत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथक भुसावळात धडकले. शिक्षकाच्या अटकेने भुसावळातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ भुसावळातील खडका रोडवरील संशयितांविरोधात चार गुन्हे दाखल संशयित मोहम्मद हनीफ याच्याविरोधात यापूर्वी भुसावळातही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर या गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष सुटका झाल्याचे सांगण्यात आले. दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलिसात संशयिताविरोधात प्रभोभक लिखाण केल्याचा गुन्हा दाखल गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने नगरपालिकेच्या उर्दू स्कूलमध्ये मो. हनीफ मो. इसाक हे गेल्या काही वर्षांपासून शिक्षक आहेत तर एका फाउंडेशनचे सचिवदेखील असल्याचे समजते. दुपारी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले व सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय आवारात मोठी गर्दी जमली तर स्थानिक पोलिसांसह एटीएसचे कर्मचारी हजर होते