---Advertisement---

Jalgaon News : दोन जखमी कामगारांचा उपचारात मृत्यू केमिकल कंपनी स्फोटात मृतांची संख्या चार

by team
---Advertisement---

जळगाव :  येथील एमआयडीसीतील मौर्या ग्लोबल लि. या केमिकल कंपनीमधील बॉयलरचा स्फोट होवून गंभीररित्या जखमी झालेल्या दोन कामगारांचा गुरुवार, १८ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे या स्फोटामध्ये मृतांचा आकडा चार झाला. दीपक वामन सुहा (वय २५, रा. विठोबानगर कालिंका मातानगर) तसेच किशोर दत्तात्रय चौधरी (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) या कामगारांचा मृत्यू झाला. बुधवार, १७ रोजी या कंपनीत शक्तीशाली स्फोट झाला.

यात दोन कामगारांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले. या सर्व जखमींवर शहरात विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. किशोर चौधरी यांच्यावर ओम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. दीपक सुहा यांना अधिकव्या उपचारासाठी मुंबई येथे रुग्णवाहिकेतून नेत होते. नाशिक येथे त्यांची प्रकृती गंभीर होवून त्यांचा मृत्यू झाला

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment