भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलिस दलातील एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या तीन पोलिस निरीक्षक, २३ सहाय्यक निरीक्षक व २० पोलिस उपनिरीक्षकांच्या १२ जानेवारी रोजी बदल्या करण्यात आल्या होत्या मात्र या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुधारीत आदेशानुसार दोन निरीक्षक, सात सहाय्यक निरीक्षक व चार पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे दोघा पोलिस निरीक्षकांना साईड पोस्टींग जळगाव एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत तर चाळीसगाव ग्रामीण निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पूर्ण केल्याने
त्यांना साईड पोस्टींग देण्यात आली आहे.
आदेश जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत. सात सहाय्यक निरीक्षकांल्या बदल्या सुधारीत आदेशानुसार जळगाव शहरचे किशोर पवार यांची भुसावळ शहर, एमआयडीसीचे अमोल मोरे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, भुसावळ तालुक्याचे अमोल अमोल पवार यांची एरंडोल शहर पोलिस ठाण्यात, भुसावळ शहरचे अनिल मोरे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात, चाळीसगाव शहरचे विशाल टकले यांची चोपडा शहर, चोपडा शहरचे अजित साळवे यांची अमळनेर पोलिस ठाण्यात, अडावदचे गणेशपुरी बुवा यांची जळगाव शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
चार पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या पाचोऱ्यातील विजया वसावे
एमआयडीसी पोलिस ठाण्यात, मेहुणबारेचे प्रकाश चव्हाणके पाचोरा, नियंत्रण कक्षातील राहुल तायडे जिल्हा विशेष शाखेत तर अमळनेरचे विकास शिरोळे यांची मेहुणबारे पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. तातडीने हजर व्हा दरम्यान, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश मिळताच बदलीस्थळी हजर राहून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावो, असे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढलेल्या आपल्या आदेशात नमूद केले आहे.