Jalgaon News: नवीन नळ संयोजने देण्यासाठी एजन्सी नियुक्त करणार

जळगाव:  निर्धारीत नळसंयोजन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आता नवीन संयोजने देण्यासाठी महापालिका एजन्सी नियुक्त करणार आहे. या एजन्सीमार्फत नळ संयोजने मिळणार आहेत.पहिल्या टप्प्यात ७० हजार संयोजनांचे ध्येय होते. वाढीव भाग, अनधिकृत संयोजने बंद करून त्यांना नवीन देणे या नुसार शहरातील ८० हजार नळ कनेक्शन पूर्ण झाले.

आता नवीन नळ कनेक्शन जोडणीसाठी महापालिकेकडून एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. सुरवातीला ८०० कनेक्शन जोडणीसाठी एजन्सी नियुक्त केली जाणार असून मार्चनंतर पुन्हा शहरातील नळकनेक्शनची मागणी लक्षात घेवून नवीन निविदा काढली जाणार आहे.

रेल्वे क्रॉसिंगचे कामही लवकरच
अमृत योजनेचा पहिला टप्यातील शिवाजी नगराकडे रेल्वे लाईनखालून जलवाहीनी टाकण्याचे काम पेंडीग होते. या कामास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. येत्या दोन तिन दिवसात त्या कामास सुरुवात होणार आहे.पंधरा दिवसापूर्वी पावती भरूनही मिळेना नळ नागरिकांनी नळ कनेक्शनसाठी पावत्या भरल्या असतांना देखील त्यांना अद्याप कनेक्शन मिळालेले नाहीत, एकीकडे रस्त्यांची कामे जोमाने सुरु असतांना दुसरीकडे नळ कनेक्शन मि ळत नसल्यामुळे नवीन मालमत्ताधारक चांगलेच कात्रीत सापडले आहे.कारण जर लवकर नळ संयोजन मिळाले नाही तर रस्ता फोडण्यासाठीचा दंड त्यांना भरावा लागेल. हा दंड टाळण्यासाठी ते वारंवार मनपात चकरा मारत आहेत.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी काही

त्या अर्जासाठी निविदा

नवीन बांधकाम झालेल्या मालमत्ताधारकांकडून नळ कनेक्शनची मागणी होत आहे. परंतु मक्तेदारास दिलेले नळ कनेक्शनचे उदिष्ट्य पूर्ण झाल्यामुळे नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्यांना नळ जोडणीसाठी महापालिकेत चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून ८०० नळकनेक्शन जोडणीसाठी निविदा राबविण्यात येत आहे.