---Advertisement---

Jalgaon News: पोलीस तक्रारीच्या संशयावरुन तरुणाला चॉपरने मारहाण

by team
---Advertisement---

जळगाव : संशयितांविरुध्द चुलत भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार देण्यास भाग पाडल्याच्या संशयावरुन पाच जणांनी रवींद्र बाबू पवार (३६) रा. गजानन पार्क कुसुंबा यांना घेरले. चॉपर लोखंडी पाईप तसेच दगडांनी मारुन दुखापत केली. ४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील अरिहंत जैन बेकरीसमोर रोडवर घटना घडली. याप्रकरणी सोमवार ५ रोजी संशयितांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

रवींद्र पवार हे मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे चुलत भाऊ राजेश जयराम पवार यांनी योगेश पाटील, सागर कोळी, अक्षय कोळी, अजय पारधी, बंटी गुजर (सर्व रा. कुसुंबा) यांच्या विरोधात शुक्रवार ३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रवींद्र यांच्या सांगण्यावरून ही तक्रार देण्यात आली, असा संशय घेत या संशयितांनी तरुणाला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पो.ना. सुनील सोनार हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment