Jalgaon Crime News: जळगाव तालुक्यातील रिधूर येथे वडील आणि मुलाला मारहाण केल्यामुळे दोन जणांना दोन वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी ३ हजारांचा दंडाची शिक्षा मंगळवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती वसीम देशमुख यांनी सुनावली आहे. विनोद दामू पाटील आणि संजय दामू पाटील असे आरोपींचे नाव आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर २०१५ रोजी विनोद पाटील व त्याचा भाऊ संजय पाटील या दोघांनी संदीप अशोक पाटील याला घरी येऊन मारहाण करण्यासह लोखंडी वस्तू मारुन जखमी केले होते. त्यावेळी संदीपला सोडवण्यासाठी गेलेले त्याचे वडील अशोक काशीराम पाटील यांनाही मारहाण केली होती. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले होते. याप्रकरणी अशोक पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात विनोद पाटील आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याच्या कामकाजादरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात विनोद पाटील व संजय पाटील या दोघांना २ वर्ष साधा कारावास, प्रत्येकी ३ हजार दंड आणि फिर्यादीस ४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वसीम देशमुख यांनी दिले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील स्वाती निकम यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी विलास पाटील यांनी काम पाहिले.