जळगाव : मारोती सुझुकी कंपनीच्या इको वाहनाचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोर्पीच्या अटकेनंतर पाच गुन्ह्यांची उकल झाली असून नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. आरोपींना एक साथीदार कारागृहात असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार आहे. मनीष उर्फ सनी रवींद्र महाजन (२०, शिरूड नाका, अमळनेर), शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील (२३, शिरूड नाका, अमळनेर) व निखील संतोष चौधरी (२२, राजाराम नगर, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना आरोर्पीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे निर्देश दिले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अमळनेर हद्दीतील पाच गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच गुन्ह्यांमध्ये साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी (रामेश्वर कॉलनी, अमळनेर) याचा सहभाग असल्याचे सांगत तो सध्या नाशिक कारागृहात असल्याची कबूली दिली. आरोपींनी अमळनेर हद्दीत पाच गुन्हे केल्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला. तसेच आरोपी मनीष यांनी केली कारवाई ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील, हवालदार संदीप पाटील, कमलाकर बागुल, प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, राहुल बैसाणे, अशोक पाटील आर्दीच्या पथकाने केली. महाजन याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. ही दुचाकी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.