Jalgaon News: महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा चाळीसगावात निवडणुकीदरम्यान हृदयविकराने मृत्यू

जळगाव : चाळीसगाव येथील मतदान केद्रावर कर्तव्य बजावत असताना जळगाव शहर महापालिकेच्या प्रभाग ३ मधील महसूल विभागातील कर्मचारी संजय भगवान चौधरी यांचे १२ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने रात्री दीडच्या सुमारास मृत्यू झाला. जळगाव शहरातील जोशी पेठेतील रहिवासी आणि म हानगरपालिकेच्या प्रभाग ३ मधील वसुली विभागातील कर्मचारी संजय भगवान चौधरी यांची लोकसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव शहरातील तेहजीब उर्दू प्रायमरी स्कूल केंद्र क्रमांक १९१ या ठिकाणी त्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली होती.

मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. रविवारी दि. १२ मे रोजी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जोशी पेठेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.गेल्या ३० वर्षापासून त महापालिकेत नोकरीला होते. सध्या वसुली विभागात त्यांना कर्तव्य देण्यात आले होते. सोमवारी, १३ मे रोजी सकाळी त्यांचा मृतदेह जळगावला आणण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आयुक्तांनी दिली भेट दरम्यान, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी भागवत, सहआयुक्त गणेश चाटे यांनी त्याच्या घरी जात कुटुंबाचे सांत्वन केले. एक चांगला कर्मचारी गमावल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.