Jalgaon News: महापालिकेतील कर्मचाऱ्यांना तब्बल 26 वर्षानंतर पदोन्नती

जळगाव: जळगाव शहर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 26 वर्षानंतर पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.  हा लाभ नवीन वर्षात मिळणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ती नवीन वर्षाची मोठी भेट ठरणार आहे.तत्कालीन नगरपालिका असताना 1997 मध्ये पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर मात्र वेळोवेळी पदोन्नतीस पात्र असूनही तत्कालीन नगरपालिका प्रशासन व महापालिकेतील तत्कालीन आयुक्तांनी या विषयाकडे दुर्लक्ष्ा केले होते. पदोन्नतीअभावी अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

अशी असेल सेवा ज्येष्ठता यादी सेवा ज्येष्ठता यादी तयार करताना 2021- 22 नुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार केली आहे. त्यावर हरकती व सुनावणी 22 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. 22 डिसेंबरनंतर सेवा ज्येष्ठता यादी अंतिम करून त्यास मंजुरी घेण्यात येईल.नविन वर्षात होणार पदोन्नती जानेवारी 2024 मध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येणार आहे. तबबल 26 वर्षानंतर महापालिकेत होणारी पदोन्नती ही पहिलीच पदोन्नती ठरणार आहे.अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी नविन वर्षाची ही भेटच ठरणार आहे.

आयुक्त व उपायुक्त गांगोडेंनी घेतला पुढाकार

2011 मध्ये सेवा ज़्येष्ठता यादी तयार केली होती. त्यावर हरकती व सुनावणी घेण्यात आली नाही. त्यानंतर  आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी याकडे लक्ष्ा देत प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू केली. पदोन्नती देण्यापूर्वी सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. सोबतच त्याचा आकृतीबंध तयार करून त्यास मंजुरीही घेण्यात आली आहे. सेवा प्रवेश नियमावली तयार करून त्यास शासनाची मंजुरीही मिळविली आहे.