Jalgaon News : माजी आयुक्तांच्या बदलीला मॅटमध्ये स्थगिती ?

जळगाव :  माजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बदलीविरोधात मॅटमध्ये धाव घेतली आहे. त्यानुसार त्यांच्या बदलीस तूर्तास स्टे मिळाला असल्याची माहिती मिळत आहे.माजी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांची १८ मार्च रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने बदली केली. बदली केल्यानंतर त्यांना त्वरित पदस्थापना देण्यात आली नव्हती. आठ दिवसांनंतर त्यांना नवी मुंबईत नगर परिषद विभागाच्या उपायुक्त म्हणून पदस्थापना देण्यात आली.

जळगावलाच पसंती माजी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना जळगाव महापालिकेतच काम करण्यास रस असल्याने त्यांनी बदली रद्द होण्यासाठी खूप प्रयत्न केल्याची चर्चा महापालिकेत होत आहे. मात्र निवडणूक आयोगाचे आदेश आणि त्यांच्याबाबत राज्य शासनाकडे गेलेल्या लेखी तक्रारी यामुळे शासनास त्यांची बदली करावी लागली.

मॅटमध्ये धाव जळगाव महापालिकेत आयुक्त म्हणून १ वर्ष चार महिने झाल्याने केलेली बदली चुकीची असल्याचे कारण दाखवत माजी आयुक्त डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली आहे.दिल्याने त्या पुन्हा महापालिकेत आयुक्त पदावर विराजमान झाल्यात. दरम्यान, त्यांना जिल्ह्यात चार वर्ष झाल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने त्यांची बदली केली.