---Advertisement---

Jalgaon News: मुलास औषध न दिल्याने संतप्त पतीने पत्नीला केली मारहाण

by team
---Advertisement---

जळगाव :  तापाने ग्रस्त आजारी मुलास घरी आणलेले औषध त्याला न दिल्याने पतीचा संताप झाला. त्याने पत्नीच्या कानशिलात लगावत हाताबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुध्द तक्रार दिली.37 वर्षीय विवाहिता ही पती तसेच मुलासह शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरात राहते. या दाम्पत्याचा मुलगा तापाने आजारी झाला. त्याला घरी पतीने औषध आणले. पती घरी आल्यानंतर त्याने चौकशी केली असता मुलास औषध दिले नसल्याचे समोर आले.

याप्रकाराने पती भडकले. संतापात त्यानी पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करीत हातातील चावी पतीने पत्नीच्या कपाळावर मारत दुखापत केली. घरातील टीपॉयची काच पतीने फोडली. यात पत्नीच्या पायाला दुखापत झाली. शनिवार 16 रोजी सायंकाळी हा प्रकार राहत्या घरात घडला. याप्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरुध्द कैफियत मांडली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोहेकॉ बालाजी बारी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment