जळगाव : प्रेमाचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिला चाळीसगाव तालुक्यातून संशयित तरुणाने नाशिक जिल्ह्यात पळवून नेले. शेतात त्याने अल्पवयीन अत्याचार केला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात १९ वर्षीय लक्ष्मण मोरे याला सोमवार ८ रोजी बुधवार १० पर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितनुसार, पीडित मुलगी सोळा वर्षीय आहे. तिच्याशी प्रेमाचा दिखावा केला. लग्न करण्याचेही त्याने अमिष दिले. त्यानंतर तिला २८ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ पहाटे २ वाजेच्या दरम्यान पळवून नेले. नाशिक जिल्ह्यात एका शेतात संशयित तरुणाने मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित लक्ष्मण याला रविवार ७ रोजी त्याला ताब्यात घेत आज न्यायालयात हजर केले. सरकारी वकील अॅड. निलेश चौधरी यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने संशयितास १० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.