जळगाव : शनिवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या वादळामुळे वाघूर पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडीत झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून पाणीपुरवठा एका दिवसाने पुढे ढकलावा लागला आहे.
शनिवारी सकाळपासून तापमान ४५ अंश सेल्सीअसपर्यंत होते. सायंकाळी सात वाजेनंतर अचानकपणे वातावरणात बदल होत जोरात वारा सुटला. या वाऱ्यामुळे रस्त्यावरील धुळ उडाल्याने जणू काही धुळीचेच वादळ आल्याचे भासत होते. जोरदार वाऱ्यामुळे झाड्यांचा वाळलेल्या फांद्या तुटून खाली पडल्यात. पंधरा ते वीस मिनिटानंतर वादळ शांत झाले. पूर्ण शहरासह वाघुर पंपीग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो रात्री उशिरापर्यंत पुर्ववत झालेला नव्हता.
पाण्याचे रोटेशन एका दिवसाने पुढे ढकलले
वाघुर पंपीग स्टेशनचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने रविवार, २६ मे रोजीचा पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियमित रोटेशनही एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले. यानुसार रविवार २६ चा पाणी पुरवठा २७ ला होईल. २७ चा पाणी पुरवठा २८ ला, तर २८ चा पाणी पुरवठा २९ लो हाईल. याप्रमाणे रोटेशन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांनी कळविले आहे