Jalgaon News : विधानसभा निवडणूक प्रात्यक्षिकांसह परिपूर्ण नियोजन : जिल्हाधिकारी

जळगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट, बॅटरीयुनिटसह सर्व यंत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचे बुधवारी, २ ऑक्टोबर तसेच दुसऱ्या टप्प्यात १९ अजींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यात उद्भवणाऱ्या अडचणींसह त्रुटींचे वेळीच निराकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहातात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले की, विधानसभेसाठी मतदान तसेच अर्ज भरण्यासंदर्भात सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांना पूर्वतयारीचे प्रशिक्षण तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार, मतदान केंद्र संख्या, तसेच उमेदवारांसाठी असलेल्या आवश्यक सूचनांची माहिती दिली.

निवडणूकीसाठी ९० लाख रूपये खर्च मर्यादा

विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ९० लाख असून फक्त बँक ड्राप्ट, धनादेशव्दारेच आर्थिक व्यवहार करता येतील. उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी नामांकन शुल्क रूपये १०,०००/- तर राखीव गटातील उमेदवार असेल तर ५००० रूपये असेल. उमेदवाराला कोणत्याही दोन मतदार संघात ४ उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. परंतु अर्ज दाखल करताना सूचक त्याच मतदार संघातील व मतदार यादीत नाव असेल असा असावा. अर्ज दाखल करतेवेळी १०० रूपयांऐवजी ५०० रूपयांचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तसेच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सहि करावी लागणार असून शासकिय सुटीचा दिवस वगळता अन्य दिवशी ११ ते ३ या वेळेतच अर्ज दाखल करता येईल.

नवमतदारांच्या संख्येत वाढ जिल्ह्यात लोकसभा निवडणूक

दरम्यान सुमारे ३५ लाख ५६ हजारांच्या जवळपास मतदार संख्या होती. त्यात नवमतदार तसेच प्रथमच मतदान करणार आहेत असे सुमारे ७५ हजारांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. विधानसभा क्षेत्रात ३हजार ६७७ मतदान केंद्र असून १८ लाख ७५हजार ९१८ पुरूष तर १७ लाख ७० हजार ७६२ महिला तसेच १४४ तृतीय पंथी असे ३६ लाख ४६हजार ८२४ मतदार आहेत. गेल्या वेळी १००० पुरुषांमागे ९१६ महिला मतदार असे प्रमाण होते. यावेळी त्यात वाढ झाली असून १००० पुरूषांमागे ९४४ महिला असून महिला मतदारांचे प्रमाण वाढ झाले असल्याचेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगीतले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.