जळगाव: विषप्राशनातून अत्यवस्थ झालेल्या महिलेला जळगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दोन दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवार, १३ रोजी प्रकृती अत्यवस्थ झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. कांचन विनोद तायडे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.
जामनेरची माहेरवाशीन असलेल्या विवाहिता पती तसेच बावीस वर्षीय मुलगा यांच्यासोबत अमरावती येथे वास्तव्यास होत्या. रविवार, १२ रोजी सकाळी विषप्राशनातून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी कुटुंबियांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले.
त्यांना अधिकच्या उपचारासाठी जळगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली