Jalgaon News: शॉर्टसर्किट झाल्याने लाखो रुपयांचे पीक जळून खाक, पीक जळालेले पाहून शेतकऱ्याचा आक्रोश

जळगाव:   शिरसोली येथे एक शेतकरी महावितरण कंपनीचे टाकण्याचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्यामुळे. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे, ही घटना १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली,परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असून शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील शेतकरी बळवंत महारु पाटील यांच्या शेतात रविवारी १७ मार्च रोजी केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे वीज बंद होती. हे काम संपल्यानंतर दुपारी ३ वाजता अचानक वीज आली. शेतात शॉर्टसर्किट होऊन पिकांना आग लागली. यात शेतकऱ्याचे दादर, हरभरा यासह चारा जळून खाक झाला आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटना पाहताच ते धावत आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर बळवंत पाटील यांनी उभे पीक जळालेले पाहून आक्रोश केला.