---Advertisement---

Jalgaon News: शॉर्टसर्कीट ज्वारीच्या शेतात आग, ५७ हजार ५०० रूपये किंमतीचे नुकसान

by team
---Advertisement---

जळगाव: महावितरण कंपनीच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्कीट झाल्यामुळे लमांजन शिवारातील शेत गट क्रमांक ११६ मधील शेतात आग लागली. आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये आगीत ५७ हजार ५०० रूपये किंमतीचे ज्वारी व चारा जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी १० मे रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीसात अकस्मात आगीची नेांद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील लमांजन शिवारातील शेत गट क्रमांक ११६ मध्ये हिलाल नामदेव पाटील वय ५५ रा. लमांजन ता.जळगाव यांचे शेत आहे. शुक्रवारी १० मे रोजी सोसाट्याचा वारा सुटल्याने महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांच्या झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे हिलाल पाटील यांच्या शेतात आग लागली.

या आगीमुळे त्यांच्या शेतातील ज्वारीचे कणीस आणि चारा जळून खाक झाला असून ५७ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३ वाजता खबर दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment