जळगाव: जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर दीक्षित वाडी परिसरात घडली. करुणा संतोष बोदडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली. करुणा बोदडे हिने महाविद्यालयात पहिल्या प्रवेश घेतला होता मैत्रिणीसह ती दिक्षीतवाडी येथे भाड्याने घेतलेल्या एका रुममध्ये वास्तव करत होत्या. महाविद्यालयाला सुटी असल्याने एक मैत्रीण शुक्रवारी तर दुसरी मैत्रीण शनिवार, ६ रोजी त्यांच्या गावाला रुमवरुन रवाना झाल्या. त्यामुळे करुणा ही एकटीच रुमवर होती. सिलिंडरवर चढून तिने गळफास घेतल्याचे समोर आले.
घरमालकीनिने जेवण केले का? अशी विचारपूस केली असता जेवणच करत आहे, असे उत्तर दिले. त्यानंतर त्या निघून गेल्या. जेवण केल्यानंतर करुणा हिने आतून रुमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर या तरुणीने गॅस सिलेंडर बाहेर काढले. सिलेंडरवर उभे राहून काठीच्या सहाय्याने ओढनी छताच्या हुकमध्ये अडकविली. त्यानंतर या ओढणीचा फास गळ्याला लावत सिलेंडरवरुन बाजुला होत आत्महत्या केली.मैत्रीण आल्यानंतर प्रकार उघड दरम्यान चार वाजेनंतर येथील एक मैत्रीण करुणा हिला भेटण्यासाठी आली. दरवाजा आतून बंद दिसत्याने तिने आवाज दिला.
मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिचा आवाज ऐकल्यानंतर घर मालकीन महिला बाहेर आली. त्यांनी मागच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता तरुणीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने मयतेच्या मैत्रीणीला जबर धक्का बसला आणि आक्रोश करण्याला तिने सुरुवात केली. घरमालकाने तत्काळ घटना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कळविली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी तसेच महिला अधिकारी देशमुख यांनी धाव घेतली. त्यानंतर तरुणीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तिला मृत घोषित केले.
तरुणीचा झाला होता साखरपुडा
मृत तरुणीचा काही दिवसापूर्वी विवाह निश्चित झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा साखरपुडा कार्यक्रम गावी केला होता. करुणा ही हुशार, मनमिळावू स्वभावाची होती, असे तिचे नातेवाईक व तिच्या मैत्रीणींकडून सांगण्यात आले. तिच्या पश्चात एक बहिण नेहा, भाऊ ललित, आई वडील असा परिवार आहे. शेती करून वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घटना कळताच वढोदा येथील पोलीस पाटील विकास बोदडे यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.