जळगाव : दुसऱ्याच्या शेतात फांद्या छाटण्याचे काम करताना हायटेशन तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे खाली पडून किशोर पंढरीनाथ कोळी (वय ३६, रा. साकेगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवार, १६ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारांस साकेगाव शेतशिवारात ही दुर्देवी घटना घडली. बेशुध्दावस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले.
तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन बहिणी तसेच भाऊ असा परिवार आहे. शेत मजुरी करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटना कळाल्यानंतर कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला. रुग्णालयात पंचनामा करुन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.