---Advertisement---

Jalgaon News: ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करत, मारहाण केली

by team
---Advertisement---

यावल :  यावल तालुक्यातील गाड्ऱ्या येथील भोंगऱ्या बाजारात ४० वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केला. महिलेसोबत संशयिताने बाजारात वाद घातला आणि शिवीगाळ करून मारहाण करीत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गाङऱ्या येथे रविवारी भोंगऱ्या बाजार होता. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ४० वर्षीय महिला आली असता आपश्या भायसिंग सस्ते-बारेला  याने वाद घातला व महिलेस शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी देत तिचा हात ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. महिलेने यावल पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिल्यानंतर आपश्या सस्ते-बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment