Jalgaon News : जिल्ह्यासह देशभरात सोमवारपासून २१ वी पशुगणना

#image_title

जळगाव : राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने शेतकऱ्यांकडे असलेले गोवंशीय, म्हैसवर्गीय तसेच शेळी-मेंढी आदी दुग्धोत्पादक तसेच शेतीपयोगी कामात येणाऱ्या पशुधनाची गणना १९१९ पासून करण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागांतर्गत २१ वी पशुगणना ४ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधन गणनेसाठी राज्यभरातून सुमारे ९ हजारांहून अधिक प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ३२१ प्रगणक अणि ८५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे- करण्यात येणार असल्याचे ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. अनिल शिंदे यांनी सांगितले.

आतापर्यंत २० पशुधन गणना करण्यात आल्या आहेत. या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान देशभरात २१ वी पशुगणना करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. पशुगणना धोरणकर्त्यांसाठीच नाही, शेतकरी, व्यापारी, केवळ तर उद्योजक दुग्धउद्योग आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त असल्याने दर पाच वर्षांनी ही गणना केली जात आहे. पशुगणनेमुळे राज्यातील पशुधनाची संख्या निर्धारित होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे. यात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात आढळणाऱ्या एकूण १६ पशुधन जाती, कुक्कुटादी पक्षी यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे.

शहरी भागात ८५ तर ग्रामीण भागात ३२१

जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामीणसाठी ३२१ आणि शहरी भागासाठी ८५ प्रगणक नियुक्त केले आहेत. यात तालुका अम ळनेर ग्रामीण १८ (शहरी २), जळगाव ग्रामीण २८, (शहरी १६), भडगाव ग्रामीण ११ (शहरी ३), जामनेर ग्रामीण ३० (शहरी १०), भुसावळ ग्रामीण १७ (शहरी ७), मुक्ताईनगर ग्रामीण १४ (शहरी २), बोदवड ग्रामीण १२ (शहरी ३). पाचोरा ग्रामीण २५ (शहरी ५), चाळीसगाव ग्रामीण ३६ (शहरी ६), पारोळा ग्रामीण १९ (शहरी ५), चोपडा ग्रामीण २७ (शहरी ३), रावेर ग्रामीण २७ (शहरी ७). धरणगाव ग्रामीण १४ (शहरी ५), यावल ग्रामीण २४ (शहरी ७). एरंडोल ग्रामीण १९ (शहरी ४) असे एकूण ग्रामीण भागात ३२१ तर शहरी भागात ८५ प्रगणक आणि पशुधन पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ७२० पशुगणना करण्यात आल्या असून सोमवार, २ सप्टेंबरपासून २१ व्या पशुधन गणनेसाठी जिल्ह्यात १५ तालुका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पशुधन पर्यवेक्षक गणना कर्मचारी ग्रामीण तसेच शहरी भागात घरोघरी जाऊन पशुमालकांकडे असलेले गोवंश, म्हैसवर्गीय तसेच कुक्कुट, वराह आदी पशुधनाची माहिती नोंदविण्यात येणार असून टॅगिंग केल्याशिवाय पशुगणना करू नये, अशा सूचनाही प्रगणकांना देण्यात आल्या आहेत.

– डॉ प्रदीप झोड उपायुक्त पशुसंवर्धन