Jalgaon News : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान २.० ची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट असून, यामध्ये शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्रोक्त व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्याची प्रक्रिया करणे समाविष्ट आहे.
या योजनेअंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्रशासनिक मान्यता मिळवण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी वेळोवेळी मंत्रालयात पाठपुरावा केला होता. त्यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून, जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास २६ मार्च २०२५ रोजी राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता आली या देण्यात आहे. प्रकल्पाला नगरविकास विभागाने शासन निर्णय क्र. स्वमअ
२०२३/१०६०११२(३)/नवि-३४, दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी दिली आहे.
प्रकल्पास मंजुरी मिळाल्याबद्दल, आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश म हाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. या प्रकल्पामुळे जळगाव शहरातील कचरामुक्तीसाठी एक मोठा टप्पा गाठला जाईल आणि शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुधारणा होईल.