---Advertisement---

Jalgaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

---Advertisement---

---Advertisement---

Jalgaon News : प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ते फोटो तरुणीच्या मैत्रिणीसह तिच्या प्रियकराने व्हायरल करून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात २१ वर्षीय तरुणी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती तरुणी शाळेत शिकत असतांना तिच्या वर्गात असलेल्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या बहिणीला माहिती पडल्यानंतर तीने त्या तरुणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

हा प्रकार तरुणाला माहिती पडल्यानंतर तरुणी रस्त्याने जातांना कट मारुन आमच्या आली तर तूला रिक्षाने उडवून टाकेल अशी धमकी दिली होती. तरुणीच्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. तरुणीची बहिण ही शिक्षणाकरीता बाहेरगावी असतांना, तिला २२ जुलैला अनोळखी इन्स्टाग्रामवरून तिच्या बहिणीचे तरुणासोबतचे फोटो टाकले.

याबाबत तरुणीच्या बहिणीला विचारले असता, तिने मलाही असेच फोटो आले असून, त्या व्यक्तीकडून पैशांची मागणी होत आहे. न दिल्यास फोटो व्हारल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीच्या भावाला हेच फोटो आल्याम ळे त्याने संबंधिताची चौकशी केली. फोटो व्हायरल झाल्यामुळे तरुणीने त्या तणावातून आत्महत्या केली होती. तसेच तरुणीच्या लॅपटॉपमध्ये तिला मैत्रीणीचे आणि तिच्या प्रियकराचे फोटो आणि व्हीडीओ मिळून आले आहे.

२०२४ मध्ये तरुणीने एका जणाला पाच हजार रुपये ऑनलाईन पाठवले असून तो इसमच तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. तरुणीच्या मैत्रीणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने तरुणीचे प्रियकरासोबत असलेले फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला.

त्यामुळेच तरुणीने बदनामीच्या भितीपोटी आत्महत्या केली असून याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सुबोध शिरसाठ (वय २१, रा. संभाजी नगर), तरुणीची मैत्रीण व तिचा प्रियकर रोहीत किरण हिवराळे (रा. वाटिकाश्रम) या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक संजय शेलार तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment