Jalgaon News : जिल्ह्यात डेंग्यूचा डंख, वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ

#image_title

जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात रुग्ण संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ५३ जणांना तर ऑक्टोबर महिन्यात ३५ जणांना डेंग्यूने डंख दिल्याची नोंद आहे. मात्र त्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता ही संख्या व्दिशतक पार करणारी आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांना काळजी घेण्याची गरज आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर, दोन महिन्याच्या कालावधीत एवढी ८८ डेंग्यू रुग्णांची संख्या आहे. जिल्ह्यातील ग्रामिण भागात सप्टेंबर महिन्यात २५ तर शहरी नगरपिालका क्षेत्रात २८ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात ग्रामिण भागात २१ तर नगरपालिका क्षेत्रात १४ रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत. ग्रामिण भागात भुसावळमध्ये डेंग्यूची संख्येत पावसानंतर भर पडली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपाययोजना सुरू आहेत.

पावसाळ्याच्या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली. डेंग्यूचे डास अंडी घालत असलेले उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. स्वच्छ साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांचा वावर असतो. आरोग्य विभागातर्फे डेंग्यूची हॉटस्पॉट असलेल्या परिसरात सर्वे क्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात या डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट केली जात आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातही डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने धूर फवारणी, रक्त तपासणी व सर्वे क्षण व ॲबेटींगचा अभाव असल्याचे दिसून येते. उपाययोजनांकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. खाजगी दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत.

दोन महिन्यात ४३२ डेंग्यू संशियत

दोन महिन्यात डेंग्यूचे ४३२ संशयित आढळले असून त्यात सर्वाधिक १०१ रुग्ण भुसावळ तालुक्यातील आहे. भुसावळ तालुका हा सध्यास्थितीत डेंग्यू रुग्णांचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यानंतर मुक्ताईनगर, बोदवड, यावल या तालुक्यातही डेंग्यूने हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे.

कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

जिल्ह्यात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. डेंग्यूचा वाढता प्रसाराला आळा घालण्यासाठी नागरीकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. पाण्याचे साठे झाकून ठेवावे. परिसर स्वच्छ ठेवावा. ताप येताच तातडीने रक्ताची तापसणी करून घ्यावी. वाहते पाणी नसेल तेथे त्याठिकाणी गप्पे मासे सोडावीत. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

-डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्याधिकारी, जि.प., जळगाव