---Advertisement---

Jalgaon News : धक्कादायक! माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या 

by team

---Advertisement---

---Advertisement---

Jalgaon News: जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात एका माजी नगरसेवकाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक असा हा प्रकार

शहरातील ओंकारेश्वर मंदिरासमोरी जयनगर येथे घडला असून  मयत माजी नगरसेवक बंटी जोशी या ठिकाणी राहत होते. त्यांनी 1 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

बंटी जोशी हे माजी नगरसेवक होते. त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला यामागील नेमके कारण समजून आला नाही. मात्र गेल्या महिनाभरापासून ते अस्वस्थ असल्याचे नातेवाईक व मित्रमंडळीतून सांगण्यात आले. बंटी जोशी हे शुक्रवारी दुपारी जेवण  केल्यानंतर घराच्या वर्षा मजल्यावर गेले. दरम्यान बराच वेळ झाला तरी ते खाली आले नाही त्यामुळे त्यांना बोलावण्यासाठी मोठे भाऊ आशुतोष जोशी हे गेले तेव्हा त्यांना ही घटना लक्षात आली. घटना लक्षात येतास कुटुंबातील सदस्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याच कारण गुलदस्तात आहे. बंटी जोशी यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षाचा मुलगा राजवीर, आई-वडील, दोन भाऊ भाऊजाई असा परिवार आहे.

 दरम्यान बंटी जोशी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता कैलास सोनवणे, सुनील महाजन, नितीन लड्डा, विष्णू भंगाळे, शरद तायडे, अरविंद देशमुख, प्रशांत नाईक, रिंकू चौधरी, प्रशांत सुरडकर, जमेल देशपांडे, सरिता माळी, पियुष कोल्हे, शामकांत सोनवणे, आनंद मुजुमदार आदींनी रुग्णालयात भेट देत नातेवाईकांचे सांत्वन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---