Jalgaon News : नवीन क्रेडिट कार्ड बनवून ४९ हजाराची फसवणूक

---Advertisement---

 

Jalgaon News : आधार कार्ड व पॅनकार्ड घेत क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली संशयिताने नवीन क्रेडीट कार्ड बनवून तक्रारदाराची ४९ हजार ३८.५० रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार हे दादावाडी परिसरात वास्तव्यास आहेत. २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ते शहरातील गणेश कॉलनी येथील दुसरे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) कार्यालय येथे लेखा परिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संशयिताने तक्रारदार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड घेतले. क्रेडीट कार्ड बंद करण्याचा त्यासाठी बनाव केला. ही कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने तक्रारदार यांच्या नावाने नविन क्रेडीट कार्ड बनवून त्याचा मोबाइल क्रमांक हा अपटेड केला. त्यानंतर वेळोवेळी क्रेडीट कार्डच्या मदतीने बँक खात्यातून पैसे काढुन घेत फसवणूक केली.

संशयिताने क्रेडीट कार्डीव्दारे तक्रारदार यांच्या खात्यानूत सुरुवातील १०२५ रुपये काढले. त्यानंतर २५,६२५, १०,११८, १०११८, ४१०,१७४२.५० अशी एकुण ४९०३८.५० रुपये परस्पर काढुन घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी तक्रारीनुसार कपील पाटील (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या संशयिताविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सोमवारी (२२ डिसेंबर) फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार भटू पाटील याप्रकरणी तपास करीत आहेत.

आयडी कोणाला देवू नका

आपले स्वतःचे आयडी हे कोणाकडेही सोपवू नये. शासकीय अथवा बँकेत ते स्वतःच्या कामासाठी त्याचा स्वतःच वापर करावा. आपला एटीएम पीन अथवा कार्डही कोणाजवळ देवु नये. असे केल्याने आर्थीक फसवणूक होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आपल्या पैश्यांची काळजी आपणच घ्यावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. मदत लागतच असेल तर बँकेत जावून ती मागावी. त्यामुळे फसवणूक टळू शकण्यास मदत होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---