---Advertisement---

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’, वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् पावसाचा इशारा

---Advertisement---

Jalgaon News : जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रातर्फे जळगावसह जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, यंत्रणांनाही तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या सूचनेनुसार जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, बुधवारी (२८ मे) दिलेल्या इशान्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटांसह मेघगर्जनेत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकृत शासकीय सूत्रांकडूनच माहिती मिळवावी. आपत्कालीन स्थितीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.

नागरिकांनो, अशी घ्या काळजी

विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेत पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घरातच रहावे. सुरक्षित निवारा नसल्यास सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे. विजा चमकत असताना उघड्यावर, छतावर, गॅलरीत अथवा झाडाजवळ थांबू नये. घरातील विविध वीज उपकरणे त्वरित बंद करावीत. वीजखांब, तारांचे कुंपण आणि लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये. पाण्यात उभे असल्यास तातडीने कोरड्या वस्तूना जागी जावे.

या कृती टाळाव्यात

विजा चमकत असताना दूरध्वनी, शॉवर, नळ, जलवाहिनी किंवा अन्य वीज उपकरणांचा वापर करू नये. धातूच्या तंबूत अथवा शेडखाली आसरा घेऊ नये. उंच झाडांखाली थांबू नये. धातूच्या उंच मनोन्याजवळ थांबणे टाळावे. उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून विजेचा प्रकाश पाहण्याचा मोह टाळावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---