---Advertisement---

Jalgaon News : जिल्हा पोलीस दलात फेरबदल, जळगावात चार निरीक्षकांसह १० उपनिरीक्षक दाखल होणार

---Advertisement---

Jalgaon News : नाशिक विभागांतर्गत पोलीस विभागात बदल्यांच्या माध्यमातून मोठे फेरबदल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षक आणि १० उपनिरीक्षक दाखल होणार आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या निर्देशानुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या विनंती बदल्या तसेच जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या नवीन अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचेही आदेश काढण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील १२ पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदलीनंतर तीन पोलीस निरीक्षक, पाच साहाय्यक निरीक्षक व १९ उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असून, बदली झालेल्या ठिकाणी वेळेत हजर न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षक नव्याने पदभार घेणार

पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख अहिल्यानगर येथून, शशिकांत पाटील हे मोहाडी उपनगर (धुळे) येथून, संदीप पाटील यांची नंदुरबार येथून, तर साहाय्यक निरीक्षक सिद्धार्थ आखेगावकर यांची नाशिक ग्रामीणमधून जळगाव येथे विनंती बदली करण्यात आली आहे. तसेच १० नवीन पोलीस उपनिरीक्षक जळगाव जिल्ह्यात येणार असून, चाळीसगावचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदलीनंतर अहिल्यानगर येथे तसेच पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment