जळगाव: शहरामध्ये चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे.चोरीच्या घटना वाढतच जात आहे. यामुळे नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण आहे.एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. राकेश कैलास जगताप वय २० रा. सम्राट कॉलनी असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
जाणून घेऊया काय आहे घटना. जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील राजाराम नगरात चोरट्याने 59 हजार रुपयांचे तीन मोबाईल चोरून दिल्याची घटना घडली होती. संशयित हा सम्राट कॉलनीतील गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे ,महेश महाजन, लक्ष्मण पाटील ,संदीप सावळे, विजय पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी संशयित राकेश यास तो राहत असलेल्या परिसरातून अटक केली त्याच्याकडून गून्ह्यातील तीनही मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.