Jalgaon News : घरात कोणी नसल्याची संधी हेरत संशयिताने तेरा वर्षीय मुलास फूस लावून अपहरण केले. ही घटना सोमवारी (५ मे) दुपारी अडीच ते चार वाजेच्या सुमारास शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील जिजाऊनगर परिसरात घडली. हा प्रकार कळताच जिजाऊनगर, वाघनगर परिसरात खळबळ उडाली.
कमलेश झंडुराम कुदाल (वय ३८) हा कुटुंबासह जिजाऊनगरातील प्लॉट नं.५ या ठिकाणी राहतो. बांधकाम साईटवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करतो. दुपारी त्याच्यासह कुटुंबातील सदस्य कामात व्यस्त होते. ही संधी हेरत संशयिताने तेरा वर्षीय मुलास फूस लावून पळवून नेले. मुलगा घरात नसल्याचे लक्षात आत्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी परिसर पिंजून काढला. मात्र कुठेही बेपत्ता मुलाचा शोध लागला नाही. मुलाला कोणीतरी फूस लावून पळवून नेले किंवा अपहरण केले असण्याची शक्यता लक्षात घेऊन तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे तपास करीत आहेत.
बारावीच्या निकालाचे निमित्त, युवती बेपत्ता
बारावीचा निकाल असत्याने मी गावातून पाहून येते, असे सांगून घराबाहेर पडलेली १८ वर्षीय युवती सोमवारी (५ में) पाचोरा पोलीस ठाणे हद्दीतून बेपत्ता झाली. या युवतीने बारावीची परीक्षा दिलेली होती. निकाल पाहण्यास गेल्यानंतर बराच कालावधी उलटला. मात्र ती घरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली. पोलीस नाईक तुषार विसपुते तपास करीत आहेत.