---Advertisement---

Jalgaon News : बनावट जन्म प्रमाणपत्र दाखल्यांचे मास्टरमाइंड दोघे वकील गजाआड, बांगलादेश कनेक्शन अद्याप नाही,

by team
---Advertisement---

Jalgaon News : जळगाव मनपातून देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रात बनावट पद्धतीला जळगाव न्यायालयातील दोन वकिलांनी स्वरुप दिले. दाखल्यासाठी लागणारा नमुना संशयित वकिलांनी तहसील कचेरीतून प्राप्त केला. या नमुन्याच्या अनेक प्रती (सत्यप्रत) काढून घेतल्या. या नमुन्यावर तहसीलदारांचा लागणारा शिक्का बनावट तयार केला. त्यावर स्वतःच तहसीलदार यांची बनावट स्वाक्षरी करुन हा फसवणुकीचा गुन्हा केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (७ एप्रिल) पत्रकार परिषदेतून दिली.

या बनावट शिक्क्याचा आणखी कोणत्या कामासाठी उपयोग केला. किंवा भविष्यात त्यांची योजना काय होती. याचा तपास एलसीबी करीत आहे, असे डॉ. रेड्डी म्हणाले. अॅड. शेख महमंद रईस महमंद इंद्रीस बागवान तसेच अॅड. शेख म ोहसिन शेख सादीक मनियार अशी संशयित वकिलांची नावे आहेत. दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.

काय आहे प्रकरण

जळगाव मनपातून ४३ लोकांनी खोटे जन्म दाखले प्राप्त केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेने हा प्रकार सिहसील कार्यालयाच्या लक्षात आणून दिला. बनावट दाखल्यात तहसीलदारांच्या बनावट सहीचा वापर झाल्याची खात्री झाल्यानंतर नायब तहसीलदार (निवडणूक) नवीनचंद्र भावसार यांच्या तक्रारीनुसार, संशयितावर शुक्रवारी (४ एप्रिल) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे सोपविला होता. एलसीबीने या प्रकरणात तपासाचे चक्र फिरविले असता दोन वकिलांनी या फसवणूक प्रकरणाला स्वरुप दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघ वकिलांना रविवारी ताब्यात घेतले. ७ जानेवारी (सोमवारी) दोघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पासपोर्ट, शैक्षणिक काम, ओबीसी सवलत अथवा नवीन आधार कार्ड बनविण्यासाठी त्यांनी जन्म दाखले मिळविले.

अॅड. शेख महमंद रईस तसेच शेख मोहसीन मनियार यांच्यामार्फत या संशयितांनी जन्म दाखले तयार करण्याचे काम सोपविले होते. यासाठी प्रत्येकाकडून तीन हजार फी वकिलांनी निश्चित केली होती. तसेच या कामात त्यांनी दोन ते तीन लोकांची मदत घेतली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. संशयित वकिलांनी बनावट जन्म दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयातूनच नमुना घेतला. नंतर त्यांच्या प्रति काढून घेतल्या. या नम न्यात वकिलांनीच जन्म दाखत्याची नावे टाकली. तहसीलदारांच बनावट शिक्के तयार करून ते त्यांनी मारुन स्वतःच स्वाक्षरी केली. त्यानंतर मनपातून जन्म दाखले प्राप्त केले. हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. हे दोघे संशयित दोन वर्षापासून जळगाव न्यायालयात वकिली करत आहेत. या दोघांनी गुन्ह्यात वापरलेले तहसिलदार यांचे बनावट शिक्के, तहसिलदारांकडील जन्म दाखल्याचा कौटुंबिक माहिती भरुन द्यावयाचा नमुना तसेच अन्य दस्ताऐवज हस्तगत केले आहेत.

संशयित सर्व स्थानिक

दाखले पात्र करणाऱ्या संशयितांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडण्याचे दाखले आहेत, मात्र जन्म दाखले नव्हते, हे एलसीबीच्या तपासातून समोर आले, अशी माहिती देऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी सांगितले, हे सर्व राहणारे शाहूनगर, पिंप्राळा येथील रहिवासी आहेत. काही संशयित मूळ एरंडोल, रावेर येथील आहेत.

दाखले घेणाऱ्यांकडे काय मिळाले

पोलिसांच्या तपासात जन्म दाखले प्राप्त करणारे ४३ लोकांकडे १९३० पासून नोंदी मिळून आल्या आहेत. हे संशयित स्थानिक असून, त्यांचे आजोबापासून त्यांच्याकडील दस्ताऐवज मिळून आला. तपासाच्या अनुषंगाने मनपा शाळेतील शाळा सोडल्याचे जुने दाखले प्राप्त करण्याच्या तपासाला चालना देण्यात आली आहे. या तपासात अद्यापपावेतो बांगला देश कनेक्शन समोर आलेले नाही. मात्र गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सर्व पातळीवर या गुन्ह्याचा तपास सुरू आहे,

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment