Jalgaon News : जिल्ह्यात ८ ते १९ नोव्हेंबरपर्यंत मतदार जनजागृती अभियान

#image_title

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिणसह शहरात ८ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपक्रम उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअंकित, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेच्या साने गुरूजी सभागृहात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी महापालिकेचे सहआयुक्त जनार्दन पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त योगेश पाटील यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यात ८ नोव्हेंबर रोजी मतदार शपथ, निवडणूक गीत, ९ रोजी रांगोळी स्पर्धा, १० रोजी पथनाट्य, ११ रोजी मतदार जागृती विषयी स्पर्धा, १२ रोजी मानवी साखळी, १३ रोजी विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र, १४ रोजी मॅरेथॉन, १५ रोजी औद्योर्गिक क्षेत्रातील मतदार जागृती, १६ रोजी पायी रॅली, सायकल रॅली, बाईक रॅली, १७, १८, १९ रोजी घरोघरी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भेटी देण्यात येणार आहेत.

जळगाव शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यात २६ शाळा, १४५ शिक्षक आणि यात ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्याचप्रमाणे बचत गटातील ६२० महिलांचा त्यात सहभाग राहणार असल्याचे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्य कार्यकारी श्रीअंकित म्हणाले की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत या दृष्टीने प्रशासन खबरदारीचे सर्व उपाय करीत आहे. वर्दळीची ठिकाणे सार्वजनिक जागा यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या पर्यायामार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी म तदानाची टक्केवारी कमी होती त्या भागात विविध पद्धतीने अधिकाधिक जनजागृती करून थेट मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा भरातील ग्रामपंचायती पंचायती देखील सहभागी होणार आहेत. सोबतच जिल्हाभरात या उपक्रमासाठी तरुण आयकॉन देखील नेमण्यात आले आहेत. काही भागात दळवळणाची साधने कमी असतील किंवा काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवत असेल की, ज्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा विपरीत परिणाम होत असेल अशा ठिकाणी देखील सबंधित यंत्रणेच्या साहाय्याने सर्व बाबींवर उपाय योजना करून मतदानाचा टक्का कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचेही सीईओंनी सांगितले. मतदार जनजागृतीसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली जनजागृतीची साधने वापरून देखील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.