जळगाव : मुलांचे अधिकार आणि कायदेशीर हक्क या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव मार्फत जिल्ह्यातील पॅनल विधीज्ञ व अधिकार मित्र (समांतर विधी सहायक) यांचे युनिट स्थापन करुन निवड केलेल्या पॅनल विधीज्ञ व अधिकार मित्र (समांतर विधी सहायक) यांचेसाठी दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले होते.
ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे परीपत्रकांन्वये प्रत्येक जिल्हास्तरावर मुलांसाठी कायदेशीर सेवा युनिट तयार करण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २ व ३ डिसेंबर रोजी घेण्यात आली.
या कार्यक्रमास २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एम. पी. जसवंत व बाल न्याय मंडळ सदस्य डॉ. शैलजा चव्हाण व मुख्य लोकअभिरक्षक अब्दुल कादौर अब्दुल शेख, उप मुख्य लोकअभिरक्षक मंजुळा मुंदडा, सहायक लोकअभिरक्षक शिल्पा रावेरकर, सहायक लोकअभिरक्षक सागर पी. जोशी, सहायक लोकअभिरक्षक हर्षल आर. शर्मा हे उपस्थित होते.
एम. पी. जसवंत. २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जळगाव व डॉ. शैलजा चव्हाण, अब्दुल कादोर अब्दुल शेख व मंजुळा मुंदडा यांनी उपस्थीत पॅनल विधीज्ञ व अधिकार मित्र (समांतर विधी सहायक) यांना मुलांचे अधिकार व त्यांचे कायदेशीर हक्क या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबीर हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्र. अधिक्षक श्री बी. के. मोरे, कनिष्ठ लिपीक आर. के. पाटील, प्रमोद ठाकरे, शिपाई पी. बी. काजळे, जावेद पटेल, श्री सचिन पाटील यांचे सहकार्याने पार पडले,