जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भैय्यासाहेब गंधे सभागृह, या ठिकाणी हा महोत्सव येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 6 ते 10 या वेळेत पार पडणार आहे.
ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तथा विकास खारगे, मुख्य सचिव (सांस्कृतिक कार्य विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव पार पडणार आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सुरेल कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
हेही वाचा : जि.प. कर्मचाऱ्याची राहत्या घरात आत्महत्या, तीन जण ताब्यात
कलाकारांची जुगलबंदी
रविवार (दि.2) रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक गायक चैतन्य परब, ख्यातनाम गायिका अमृता काळे, विख्यात सारंगीवादक साबीर खान, ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण होणार आहे.
सोमवार (दि.3) रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक ऋतुराज धुपकर व कृष्णा साळुंखे, प्रसिध्द गायक अनुरत्न रॉय, बासरीवादक चिंतन कट्टी व ज्येष्ठ गायक धनंजय जोशी यांचे सादरीकरण होईल.
मंगळवारी (दि.4) रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक जगन्मित्र लिंगाडे व यश खडके यांची जुगलबंदी, प्रसिध्द गायिका रौकिंणी गुप्ता यांचे गायन होणार आहे. पद्मश्री पंडित रोणू मुजुमदार व ऋषिकेश मुजुमदार यांची बासरी जुगलबंदी व ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे नामवंत भारुडकार शास्त्रीय संगीत गायन व वादन कला सादर करणार आहेत.