जळगाव : भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात भाजपा मंडळ क्र १ तर्फे भाजपा सदस्य नोंदणी अभियान व जळगाव शहराचे नवनिर्वाचित आमदार सुरेश भोळे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन काण्यात आले. आ. सुरेश भोळे यांच्या सत्कार कार्यक्रमात जळगाव शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तोच ओघ निवडणुकीचा निकालानंतर देखील पाहावयास मिळत आहे. नवनिर्वाताचीत आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव शहर कांग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा योगिता शुक्ल , अमिना तडवी, रत्ना बागुल, सुमन मराठे यांच्यासह सामाजिक कार्यकत्याऀ सुजना पवार, कविता माळी, शानुबाई भोई, मुशिर तडवी , दिपक नाझरकर, भुषण सांगोरे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
प्रथम सर्वांची सदस्य नोदणी करण्यात आली. यानंतर आमदार राजुमामा भोळे, उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जेष्ठ नेते सुभाष तात्या शौचे, मंडळ १ चे अध्यक्ष संजय शिंदे, नगरसेवक राजू मराठे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, सरचिटणीस जहांगीर भाई खान, सरचिटणीस उन्मेश देशपांडे, महेश चौधरी, दिनेश पुरोहित, भाजपा मिडिया प्रमुख मनोज भांडारकर, दिलीप नाझरकर, ज्योती राजपूत,संगीता पाटील, प्रसाद शुक्ल, हरीश सोनवणे, वा सिम भाई शेख, निंबाळकर, रमेश जोगी, संजय सोनवणे, हरीश चौधरी यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.