जळगाव : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून आपल्याला कसा विजय मिळेल यासाठी आपापल्या परीने कामाला लागले आहेत. हि निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांना २५ हजारांची अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. तर अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीमधील (एसटी) उमेदवाराला यातून थोड्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. यासोबत उमेदवार निवडणूक प्रचारासाठी किती पैसे खर्च करु शकतो ही मर्यादा भारत निवडणूक आयोगाने देखील सांगितली आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी हा खर्च १० किंवा २० लाख रुपये नाही तर याहून कितीतरी अधिक म्हणजेच ९५ लाख रुपये आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत वेळोवेळी बैठक घेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरसूचीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी मान्यता दिली आहे.
यात भेळ प्रती प्लेट ३० रुपये, राईस प्लेट ६५ रुपये व अनलिमिटेड राईस प्लेट करीता १०० रुपये आदी दरनिश्चित करण्यात आले आहेत. या निवडणूक खर्च उमेदवाराला विहित मुदतीत सादर करणे आवश्यक असणार आहे.
जळगाव , रावेर लोकसभा उमेदवारांसाठी खर्च दरपत्रक जाहीर
by team
Updated On: एप्रिल 16, 2024 2:18 pm

---Advertisement---