---Advertisement---
Jamner News: जामनेर तालुक्यातील शहापूर येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यात चोरट्याने सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शहापूर येथे सुरेश रामदास डोंगरे राहत असून त्यांचा शेती व्यवसाय आहे. त्याच्या शहापूर येथल पोस्ट ऑफिस मागील पंतप्रधान अवास योजनेतील घरात घरफोडी झाली आहे. या घराला दरवाजा नसल्याने घराच्या दरवाज्याला लावलेला पत्रा आणि लाकूड काढून चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील ९ हजार रुपये रोख, ९ हजार रुपयांचा सॅमसॅग कंपनीचा मोबाईल, १९ हजार ५०० रुपयांचे मनीमंगळसुत्र, ७ हजार रुपये किंमतीचा ओप्पो मोबाईल, ९ हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, ११ हजार रुपये कंपनीचा व्हिओ कंपनीचा मोबाईल व १० हजार रुपये किंमतीचा रेडमी मोबाईल असा एकूण ७४ हजार ५०० रुपयाचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे. सदरची घरफोडी हि दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेपासून ते दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली आहे.
या प्रकरणी सुरेश डोंगरे यांनी फिर्याद दिल्याने जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.









